सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला झटका भाजप शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांची कार्यकर्त्यांसह पक्षाला राम राम केला आहे. महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच पक्षाने अपेक्षित प्रभागातून तिकीट नाकारल्याने पक्षावार नाराज असल्याने आपण पक्ष सोडत असल्याचं प्रधाने यांनी सांगितलं.
स्वतः पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 1 हजार समर्थक कार्यकर्ते आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच पक्षातील वरिष्ठानी कोणीतही समजूत घातली नसल्याचंही बिज्जू प्राधान यांनी सांगितलं.






