संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमसोबतच्या आघाडीची चर्चा फेटाळून लावली.
शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे तुम्ही बंगाल आणि उत्तर प्रदेशातही पाहिलं आहे. जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाच संबंध येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.






