मुंबई: शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या वनमंत्री राहिलेल्या एका नेत्याने एक वर्षापूर्वी मुंबईत मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटी रुपयांचं कारपेट टाकल्याचा गंभीर आरोप केला. तसेच ईडीला हे दिसलं नाही का? असा सवाल केला. ते मुंबईत शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “एक वर्षापूर्वी मुंबईत एक लग्न झालं. भाजपाच्या नेत्याच्या मुलीचं लग्न झालं. आम्ही काही बोललो का? ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी लग्नाचा सेट जंगलाचा केला. त्याला जंगलाचा फील यावा म्हणून त्यांनी जे कारपेट टाकलं होतं त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. ईडीला हे दिसलं नाही का? आम्ही म्हणतो घरातील लग्न आहे. घरात शिरायचं नाही, पण आमच्या घरात तुम्ही अशा पद्धतीने शिरता.”