महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेटचा देव हळहळला…

0
561

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ बळी घेतले आहेत. वॉर्नच्या निधनानंतर भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरनेही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत भारतात शेन वॉर्नसाठी नेहमीच खास स्थान होते, असे म्हटले आहे. “स्तब्ध वॉर्नी, तुझी आठवण येईल. तुझ्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळवाणा क्षण आला नाही. मैदानावरील आपले शत्रुत्व आणि बाहेरचे विनोद नेहमी लक्षात राहील. तुझ्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझ्यासाठी विशेष स्थान होते,” असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.