मुंबई येथे भारतीय जनता पार्टी च्या झालेल्या मीटिंग मध्ये महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांसाठी व युव्हरचना आखण्यासाठी राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी नेमण्यात आली. या कोअर कमिटी मध्ये माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील कार्य , नियोजन , दौरे ,यात्रा, प्रचार , प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे यासाठी ही समिती कार्य करते .
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचे दिवंगत नेते मा. सूर्यभान वहाडणे , ना. स.फरांदे
यांच्या नंतर पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने या विस्तारित कोअर कमिटी वर सदस्य म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने भाजपा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
पक्षाने दिलेल्या गोवा येथील विधानसभा निवडणुकीची ही जबाबदारी श्री.शिंदे यांनी अतिशय जबाबदारी व नेटाने पार पाडली असून त्यांच्या कार्यकौशल्याने नक्कीच त्यांना दिलेल्या मतदारसंघात निकालाच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसणार आहे
Home नगर जिल्हा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे राजकीय वजन वाढले, भाजपच्या विस्तारित कोअर कमिटीत...