Monday, May 20, 2024

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ११ फ्लॅट जप्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे बिझनेसमन श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. पाटणकर यांचे जवळपास साडे सहा कोटींचे ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. आतापर्यंतची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ईडी लागली होती. पण आता ईडीचं टार्गेट ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय आहेत.
शेल कंपनीच्या मालकांनी पाटणकरांना विनातारण ३० कोटी रुपये दिल्याचा आरोप श्रीधर पाटणकर यांच्यावर आहे. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एन्ट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज साईबाबा गृहनिर्मीती प्रा.लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलं, असा आरोप ईडीने ठेवलेला आहे. या ट्रान्सफर केलेल्या पैशातूनच पाटणकरांनी या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असं बोललं जातंय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles