मोठी बातमी.. शिक्षक बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ‘त्या’ नेत्याला कंटाळून राजनामा

0
4727

मोठी बातमी.. शिक्षक बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ‘त्या’ नेत्याला कंटाळून राजनामाIMG 20220326 223448

अविनाश निंभोरे गंगाराम गोडे यांचा सत्ताधारी नेत्यांना कंटाळून पदाचा राजीनामा

आज दिनांक 26 मार्च २०२२ रोजी बँकेच्या संचालक मंडळाची मासिक मीटिंग झाली त्यामध्ये सत्ताधारी मंडळाच्या अवास्तव मागणीला कंटाळून आणि वेळोवेळी निवेदन देण्याच्या पद्धती ला कंटाळून चेअरमन निंभोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

गेल्या सहा महिन्यापूर्वी निंभोरे विरोधी गटातील सहा संचालक फोडून निंभोरे चेअरमन झाले होते त्यावेळेस त्यांचे नेते सेवानिवृत्त गुरुजी आणि सर्व नेत्यांनी बँकेत देऊन त्यांचा सत्कार केला होता त्यावेळेस नेत्यांचे सांगणे होते काहीही करा पण सत्ता आणा निंभोरी नि सत्ता आणली परंतु त्याच वेळेस त्यांच्याविषयी त्यांच्या नेते गणांची आणि भक्तांची त्यांच्याविषयी विनाकारण नाराजी होऊ लागली गेल्या सहा महिन्यात निंभोरे बँकेमध्ये मदत करण्याऐवजी बँकेमध्ये सल्ला देणे ऐवजी आतून एक आणि बाहेरून एक अशा पद्धतीने फक्त आणि फक्त निवेदने देऊन सभासदांना वेड्यात काढायचे हाच उद्योग आणि भक्त मंडळींनी चालवला होता या सर्व गोष्टींना कंटाळून आज निंभोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तत्कालीन कारण हेच की बँकेला सभासदांना कायम ठेवीच्या मिळणारे व्याजपोट नियमानुसार सर्वात जास्त 31 मार्च रोजी मिळणारे व्याज परंतु विचारात न घेता आरबीआय सहकार खात्याचे नियम विचारात यांनी केलेले अवास्तव मागणी ला कंटाळून अखेर निंभोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे अशी चर्चा शिक्षक बँकेच्या नेते मंडळीत आहे