यशवंतराव गडाख म्हणाले…. उद्धव ठाकरे यांनी सन्मान दिलाय… जिल्हा परिषदेच्या सर्व आठ जागा जिंकून आणू

0
1096

नगर: नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या 80 कोटी रुपये खर्चाच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार दि.18 फेब्रुवारी रोजी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मुळा उद्योग समुहाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

माजी खा.यशवंतराव गडाख म्हणाले, 40 वर्षांपूर्वी प्रतिदिन 1500 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेचा कारखाना मी उभा केला.आता तो 10 हजार टन क्षमतेचा झाला आहे. स्थापनेपासून कारखाना माझ्याच ताब्यात आहे,हा सभासदांचा विश्वास असल्याने शक्य झाले,शेतकऱ्यांचा विकास झाला. आता शंकरराव बघतात.कर्ज काढून नवीन प्रकल्प उभारणीचा शंकररावांनी धाडसी निर्णय घेतला.प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज चार-पाच वर्षात फेडू.

उद्धव ठाकरे सारखा मनमिळावू, सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री मिळाला हे आपले सर्वांचे भाग्य आहे.

तीन पक्षाचे आघाडी सरकार ते मोठ्या हिंमतीने चालवत आहे.भाजपला झोपा नाहीत,कधी सरकार पडते याचीच वाट पहात आहेत.कोरोना काळात केलेल्या कामामुळे देशात उद्धवजींचे नाव झाले.

शंकरराव तुम्ही सेने बरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला.ज्या पक्षासाठी आम्ही आयुष्य वेचले,वार झेलले त्यांनी आमचा भ्रम निराश केला.शेवटी उद्धव साहेबांनी न्याय दिला.उध्दवजीनी दाखवलेला विश्वास वाया जाऊ देऊ देणार नाही. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 ही जागा जिंकू अशी परिस्थिती आहे.ठाकरे घराण्याशी असलेले पूर्वीचे संबध तरुण पिढीने अधिक वाढवावेत