राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंनी केले खंडण…मी भाजपमध्येच
नगर : भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच माजी मंत्री कर्डिले यांनी या सर्व चर्चांचे खंडण केले आहे. माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येते व लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जाते. मी भाजपमध्येच असून भाजपमध्येच राहणार असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षांतरासंबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला कर्डिले यांनी महानगर न्यूजशी बोलताना दिला आहे.
Home ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंनी केले खंडण…मी भाजपमध्येच