श्रीरामपूर शहरातील एका लॉजमधील वेश्या व्यवसायावर छापा घालून पोलिसांनी दोन पीडित महिलेची सुटका केली तर दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
श्रीरामपूर शहरातील एका लॉजमध्ये हायप्रोफाईल महिलांकडून वेश्याव्यवसाय होत असल्याची खात्रीशिर बातमी डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली. त्यावरून त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील या लॉजवर बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकला.
यावेळी या पथकाने दोन पीडित महिलांची सुटका केली असून लॉजमालकासह एकास ताब्यात घेतले आहे. आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय( वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक)व विश्वास रामप्रसाद खाडे (वय 26
रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर्) यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ, पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.







मराठी मध्ये बातमी छापा .
Comments are closed.