Home राज्य वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून 5 हजारांची लाच…कनिष्ठ लिपिक ‘एसीबी’च्या जाळयात

वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून 5 हजारांची लाच…कनिष्ठ लिपिक ‘एसीबी’च्या जाळयात

0
449

नंदुरबार : आदिवासी वस्तीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून पाच हजाराची लाच मागितली. ही लाच घेताना तळोदा प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आदिवासी वसतीगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारतांना तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर भरतसिंग पावरा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तळोदा वरिष्ठ महाविद्यालयातील एफवायबीएला शिक्षण घेणाऱ्या तक्रारदार विद्यार्थ्याकडून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक किशोर पावरा यांनी वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली होती.