विद्यमान मुख्यमंत्री दोन जागी लढले… दोन्ही जागांवर मोठा पराभव

0
888

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. चरणजितसिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला आहे. या निवडणुकीत चन्नी यांनी चमकौर साहिब आणि भदौर या जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना आपली खुर्ची वाचवता आली नाही. दरम्यान, ज्या पक्षाने पंजाबमध्ये बहुमत मिळवले, त्या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ आता चर्चेत आला आहे. ज्या दोन जागांवर चन्नी यांनी निवडणूक लढवली, त्या जागांवर त्यांचा पराभव होणार, असे केजरीवाल म्हणाले होते. निवडणुकीआधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हा दावा केला होता. आता तो खरा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे छातीठोकपणे सांगत लिहूनही दिले होते. तो व्हिडिओ आता समोर आला आहे.