Monday, May 20, 2024

व्हॅलेंटाईन्स डे, स्व.राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचे भावनिक ट्विट

काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव यांचे गेल्या वर्षी कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन झाले होते. राजीव यांच्या निधनानंतर हा पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे आहे. साहजिकच त्यांची पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मनात पतीच्या आठवणी दाटून आल्या आहेत. प्रज्ञा सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

“प्रिय राजीव जी, तुम्ही कुठेही असाल तरी, या व्हॅलेंटाईन डे निमित्त मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझे कालही तुझ्यावर प्रेम होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते. उद्याही मी तुमच्यावर प्रेम करत राहीन. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करत राहीन.” अशा आशयाचे ट्वीट प्रज्ञा सातव यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles