शरद पवार यांचे MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर मोठे विधान
बारामती: एआयएमआयने महाविकास आघाडीत येण्याबाबतचा प्रस्ताव आघाडीला देण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव नाकारला असला, तरी भाजपने मात्र महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार बारामीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. पवार म्हणाले की, कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्या सोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर होय म्हटले पाहिजे. आणि हा राजकीय निर्णय आहे. हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कोणी प्रस्तावित केला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारच्या राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधित निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. महाराष्ट्राच दोन दिवस मी हे वर्तमानपत्रात वाचत आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणताही निर्णय नाही.






