शिंगवे नाईक येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाने जोरदार तयारी केली आहे सर्व तरुण उमेदवारांना उतरविले निवडणुकीच्या रिंगणात……
शिंगवे नाईक येथे गेल्या काही दिवसापासून विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचे वादळ सुरू झाले आहे. अनेक वर्षापासून प्रस्थापित खुर्च्या सोडायला तयार नसल्यामुळे यावर्षी नव्याने उदयाला आलेला स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाने सर्व तरुण उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. असं म्हणतात की प्रत्येक क्षेत्रात तरुणाई पुढे आली तर देश विकसित होण्यास काहीच वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे तरुणांच्या हातात सहकारी संस्था दिल्यास शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी या संस्थेमार्फत सोडविण्यास मदत होईल असे मत स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आजच्या रंग पंचमी च्या मुहूर्तावर शिंगवे विविध कार्यकारी सोसायटी वरती स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाचे सर्व तरुण उमेदवार गुलाल उधळवतील का? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.