शिक्षक आमदार संघाप्रमाणे सैनिक आमदार व्हावेत त्रिदल सैनिक संघटनेची मागणी

0
115

शिक्षक आमदार संघाप्रमाणे सैनिक आमदार व्हावेत त्रिदल सैनिक संघटनेची मागणी

तालुका प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यात ज्याप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सात विभागात सात आमदार आहेत. शिक्षक मतदारांची संख्या व आजी-माजी सैनिकांची संख्या सारखीच आहे.महाराष्ट्र राज्यातील आजी माजी सैनिकांची परिवारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सात विभागात सैनिक मतदार संघाची रचना करून सात सैनिक आमदार होणे गरजेचे आहे.आज सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी देशाच्या सिमेवर अहो रात्र असतात,अशा वेळी सैनिकांच्या परिवाराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामध्ये प्रामुख्याने शेतीचे वाद,रस्ते अडवणे,जमिनीवर अतिक्रमण करणे,सैनिक परिवारास मारहाण करणे असे अनेक प्रश्न आहेत.
जो सैनिक देशाचे रक्षण करतो त्या सैनिकाच्या परिवारावर अन्याय होत असेल तर त्या सैनिक परिवाराला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे,अशा मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ,त्रिदल सैनिक संघ गुंडेगाव व राज्यातील सर्व सैनिक परिवार,शहीद परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद सदस्य व राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य, महापालिकेमध्ये दोन नगरसेवक व नगर परिषद सदस्य,राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य आरक्षित करावेत व माजी सैनिकांना समाजसेवा करण्याची संधी निर्माण करून द्यावी अशा मागणीचे निवेदन हे राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, तसेच केंद्रीय निवडणूक आयोग,भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.यावेळी त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष शामराव कासार, उपाध्यक्ष भवानीप्रसाद चुंबळकर, सचिव सतिश हराळ, राहुल चौधरी, कारभारी आगळे,नारायण भापकर, संभाजी भापकर,छबुराव येठेकर,इ आजी-माजी सैनिकांनी हे निवेदन दिले आहे.व हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे..