श्री साईबाबांच्या शिर्डीत रथयात्रा व गुडीपाडवा मोठ्या उत्साहात संपन्न
प्रतिनिधी- विक्रम बनकर मराठी नववर्षाच्या गुडीपाडव्या निमित्त साईबाबा मंदिराच्या कळसावर गुडी उभारण्यात आली.
गुढीपाडव्या निमित्त संस्थानच्या वतीने आज सकाळी श्री साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री श्रीमती अनुराधा आदिक, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या रथयात्रेला साईभक्तांची शिर्डीत मांदिआळी
श्री साईबाबा संस्थानच्या वतिने सायंकाळी ५ वाजता श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, विश्वस्त सर्वश्री अॕड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, महेंद्र शेळके, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.