मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी निधीवाटपाच्या मुद्दयावरून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. सरकार ठाकरेंचं असलं तरी लाभ मात्र पवार सरकारला मिळतो, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे. मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईमध्ये नगरोत्थान आणि नगरविकास विभागाचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो ही. मात्र, सध्या निधीची पळवापळवी केली जात आहे. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशी खोचक टिप्पणी गजानन किर्तीकर यांनी केली होती.