बीड: बीड शहरातील पेठबीड भागात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झालाय. रामसिंग टाक असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. टाक पती-पत्नीवर तलवारीने वार करण्यात आले असून, यात ते दोघेही जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहराच्या पेठ बीड भागात ऐन वर्दळीच्या वेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. रामसिंग टाक यांच्यावर जुन्या कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. या हल्ल्यात रामसिंग टाक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आलाय.






