कोविडशी दोन वर्ष संघर्ष केल्यानंतर राज्य सरकारची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 15 हजार 106 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
बार्टीच्या विविध योजना व अन्य कामांसाठी 250 कोटी रुपये त्याचबरोबर कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ विकासासाठी निधी देण्यात येणार आहे. तृतीय पंथीयांची नोंदणी, ओळखपत्र, रेशन कार्ड तसेच त्यांना बीज भांडवल योजनेतून कर्ज देण्यासाठी निधी देण्याचेही आजच्या अर्थसंकल्पात दादांनी स्पष्ट केले.
सफाई कामगारांना गटार सफाईसाठी आता आधुनिक मशिन्स मिळणार आहेत, मॅन्युअल स्कॅव्हेंजर बंदीच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सामाजिक न्याय विभागास सुमारे 1 हजार 800 कोटी रुपयांची वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व महाविकास आघाडी सरकारचे आभार.