२०० प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीचा लाभ
खा. नीलेश लंके यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
नगर : प्रतिनिधी
राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व परिसरातील २०० तरूणांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. याप्रकरणी खा. नीलेश लंके हे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते.
या प्रकल्पग्रस्तांनी दाखल्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जाचक अटी लादून प्रकल्पग्रस्तांचे दाखल फेटाळून लावले होते. दोन वर्षांपूर्वी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर प्रभाकर पवार, विकास भिंगारदे, भूषण शेंडगे, जगदीश अडसुरे,कुणाल कर्डक, आरबाज शेख, रवींद्र गिरगुणे आदींनी तत्कालीन आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले. लंके यांनी याप्रश्नी तात्काळ तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. खा. लंके यांच्या पाठपुराव्यादरम्यान या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तोडगा काढण्याची मागणी केली होती. मंत्री जाधव पाटील यांना तसे निवेदनही खा. लंके यांनी सादर केले होते.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय पारीत केला असून त्यामुळे राहुरी व परिसरातील सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना आता नोकरीची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांना मिळाले दाखले !
खा. नीलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर शासन निर्णय पारीत झाल्यानंतर दिपक भिंगारदे, विकास भिंगारदे, असिफ शेख, भुषण शेंडगे, शुभम गायकवाड, सोमनाथ मगर, कुणाल कर्डक, नितीन ताकटे, ॠषीकेश देशमुख, विशाल पवार, शैलेश धोंडे, खेडेकर, श्रीकांत पवार, दादासाहेब भिंगारदे, बाळू भिंगारदे, दर्शन गाढवे, प्रविण देठे, दिनेश शेंडगे, प्रविण गिरगुणे, अमोल गिरगुणे.
विजय दिलीप कर्डक या हा प्रकल्प दस्त्यामध्ये आम्हाला डावलण्यात आला आहे हा कुणाल कर्डक व त्याचे गट क्रमांक14 पांडुरंग बहिणीचे कर्डक यांच्या नावाने दस्ताव निघत असतात यांना दोन मुलं असताना हिरालाल पांडुरंग कर्डक व अण्णा पांडुरंग कर्डक एकाच नाव काय घेतलं जात आहे
मुळात ही बातमीच चुकीची आहे. शासन निर्णय कोणी आणला . चुकीची माहिती देऊन उगीच गैर समज निर्माण करू नका. आणि मुळात फक्त 25 ते 30 दाखले ट्रान्स्फर होणे बाकी होते. बातमी मध्ये 200 दाखवत आहे. मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे.भरती साठी मंजुरी कोणी आणि कशी आणली हे फक्त आम्हालाच माहिती आहे.
Comments are closed.