सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबाबत टपाल कर्मचारी आक्रमक
जोरदार घोषणाने दुमदुमून गेला परिसर
अहमदनगर: नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा,यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे अहमदनगर विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी केला आहे.
टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना आपल्या केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार संघटनेचे सभासद या दोन दिवसीय संपात सहभागी झालेले आहेत.आज संपाच्या पहिल्यादिवशी अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर द्वारसभेचे आयोजन केले होते सभेस श्री संतोष यादव यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा,कामगार कायद्यात सकारात्मक बदल करा टपाल विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्याची छळवणूक थांबवा, कोरोनाकाळात सेवा देत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्या व त्याच्या वारसास अनुकंपावर सेवेत सामावून घ्या यासह सर्व मागण्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सभेस संघटनेचे विभागीय सचिव श्री कमलेश मिरगणे,प्रमोद कदम, श्री सुनिल थोरात,श्री आनंदराव पवार,अमित कोरडे,सलीम शेख,संजय परभने, यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री नामदेव डेंगळे, श्री संदीप कोकाटे,श्री अनिल धनावत, श्री भाऊ श्रीमंदिलकर, प्रदिप सूर्यवंशी,,श्री राधाकिसन मोटे,सागर पंचारिया,तान्हाजी सूर्यवंशी,नितीन थोरवे,अभिमन्युकुमार,श्रीमती आश्विनी चिंतामणी,श्रीमती मोनाली हिंगे,श्रीमती निलिमा कुलकर्णी,श्रीमती अर्चना भुजबळ,शुभांगी शेळके,श्रीमती नाजमीन शेख,सविता ताकपेरे, शुभांगी मांडगे,सुनील भागवत,किशोर नेमाने ,अंबादास सुद्रीक,स्वप्नील पवार,बाबासाहेब बुट्टे,यांचेसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
द्वारसभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे विभागीय सचिव श्री कमलेश मिरगणे तर आभार प्रदर्शन श्री संदीप कोकाटे यांनी केले.
प्रमुख मागण्या
नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागु करा.
टपाल विभागाचे खाजगीकरणाचे धोरण थाबवा.
कामगार संघटनेवरील हल्ले थांबवा.
डाक विभागातील रिक्त जागा भरा.
थकीत महागाई भत्ता त्वरित द्या.
कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचा वारसास दहा लाखाचे आर्थिक मदत द्या व वारसास अनुकंपा वर सेवेत सामावून घ्या.
ग्रामीण डाक सेवकांना कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशी लागु करा.






