7th pay commission… सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्ता वाढला!

0
2866
7th pay commission news

7th pay commission
केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे महागाई भत्ता आता 34 टक्क्यांहून वाढून आता 38 टक्के झाला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेली महागाई भत्त्यातील वाढ ही जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळासाठी असणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता 38 टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे असणार आहे.