7th Pay Commission सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती. मात्र महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं मानलं जात आहे. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवला जात आहे.
देशातील वाढती महागाई पाहता, जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्यांचा पगार 8 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.






