7th pay commission… सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक दिवाळी भेट

0
3421
7th pay commission news

7th pay commission

दिवाळी तोंडावर आलीये, सर्वजण खात्यात असणाऱ्या रकमेनुसार आणि कंपन्यांकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसच्या बळावर सण साजरा करण्याची गणितं मांडू लागली आहेत.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदी सरकारकडून या कर्मचाऱ्यांना आणखी एक घसघशीत भेट देण्यात आली आहे.

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर एलटीसी सुविधेमध्ये दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व पात्र सरकारी कर्मचारी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही योजना 26 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेत प्रवासाच्या येण्याजाण्याचा खर्चही परत मिळतो.