Home देश विदेश नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस

नितीन गडकरींचा मोठा निर्णय ! अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस

0
51

रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास इतर वाहनचालक तो अपघात पाहूनही तिथे न थांबता आपल्या मार्गाने निघून जातात. बरेचजण आपला वेळ जाईल म्हणून तिथे थांबून अपघातग्रस्तांची मदत करत नाहीत. तर काहीजण पोलिसांना देखील अपघाताची माहिती देत नाहीत. पोलीस आपल्याकडे चौकशी करत बसतील, त्याचा मनःस्ताप सहन करावा लागेल, पोलीस आपल्यालाच या अपघातात अडकवतील या भितीने लोक अपघातग्रस्तांची मदत करणं टाळतात. लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्र सरकार त्यांना आता २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या लोकांसाठी सरकार बक्षिसाची रक्कम २५,००० रुपये करणार आहे. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे”.