अहिल्यानगर जिल्ह्यात तलाठी ‘एसिबिच्या’ जाळ्यात

0
58

यशस्वी सापळा कारवाई

युनिट -अहिल्यानगर

1) तक्रारदार- पुरुष,वय- 35 वर्षे

२) *आलोसे – 1) धंनजय गुलाबराव पऱ्हाड, तलाठी, सजा धारणगाव, ता. कोपरगाव, रा.जानकी विश्व्, गणेश कोचिंग क्लाससेसच्या मागे, कोपरगाव, जि. अहिल्यानगर.
2) खाजगी इसम सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी, वय 27 वर्ष, रा. धारणगाव, ता. कोपरगाव. जि. अहिल्यानगर.

3) तक्रारीचे स्वरूप:-
यातील तक्रारदार यांचा वाळू व्यवसाय असून त्यांचा मागील पंधरा दिवसापूर्वी एक वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला होता. त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु या पुढे वाळू वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आलोसे यांनी 20000/- रुपयांची मागणी केली

4) तक्रारीची पडताळणी *:-*
तक्रारदार यांनी दिनांक 05/03/2025 रोजी परिक्षेत्रीय कार्यालय येथे संपर्क करून तक्रार दिली होती परिक्षेत्रीय कार्यालय कडून अहिल्यानगर युनिटला सदरची तक्रार वर्ग करण्यात आली त्या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदाराकडे पंचा समक्ष वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आलोसे क्रमांक 1 याने स्वतःसाठी व मंडल अधिकारी पोकळे यांच्यासाठी 20,000/- रुपयांची मागणी केली व स्वीकारण्याचे मान्य केले

5) सापाळा कारवाई,:-
यातील आलोसे यांचे सांगण्यावरून खाजगी इसम यांनी आज दिनांक06/3/2025 रोजी तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष लाच रक्कम 20,000/- रुपये स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सापळा कारवाईनंतर आलोसे नं. 1 यांना संशय आल्याने ते मिळून आलेले नाहीत. त्यांचा शोध घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे.

6) आरोपीच्या अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू
आरोपी खाजगी इसम यांचेकडे लाच रक्कम 20,000/- रुपये रोख व मोबाईल

7) आलोसे यांची घर झडती – आलोसे यांची घरझडती सुरू आहे

8) इतर माहिती – आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आलोसे यांचा शोध घेऊन अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे

9) आरोपी खाजगी इसम याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे

10) आलोसे सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्रीमती छाया देवरे ,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर.
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर
▶️ सापळा पथक
पोलीस नाईक उमेश मोरे, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ *मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.