7th pay commission…सरकारी कर्मचार्‍यांची जुलैमध्ये चंगळ…सरकार मोठे निर्णय घेणार!

0
2811
7th pay commission news

7th pay commission सरकार केंद्रीय कर्मचा-यांना थकीत महागाई भत्ता देण्याचा विचार करत आहे. जुलै महिन्यात ही रक्कम अदा करण्यात येण्याची शक्यता आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 या एकूण 18 महिन्यांतील महागाई भत्ता सरकारने थकविला आहे. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. संघटनांनी अनेकदा सरकारकडे याविषयीची कैफियत मांडली आहे. सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. आता केंद्रीय कर्मचा-यांना एकदाच दोन लाख रुपये महागाई भत्ता थकबाकीसह मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत.
सरकार जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचा-यांच्या डीएमध्ये वाढ करु शकते. वाढत्या महागाईचा मुकाबला करण्यासाठी कर्मचा-यांना सरकार ही भेट देईल. डीएमध्ये 4 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या कर्मचा-यांना 34 टक्क्यांनी कर्मचा-यांना भत्ता देण्यात येतो. सरकारने यावर्षी मार्च महिन्यात भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केली होती. वाढत्या महाईत सरकार कर्मचा-यांना खुषखबरी देऊ शकते.
आर्थिक वर्ष2021-2022 साठी ईपीएफवर 8.01 टक्क्यांचा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हाच व्याजदर 8.5 टक्के होता. व्याज दर कमी झाल्याने 6 कोटींहून अधिक नोकरदारांना मोठा धक्का बसला आहे. आता सरकार जुलै महिन्यात पीएफवरील व्याज जमा करण्याची शक्यता आहे.