Maruti Suzuki च्या नवीन grand vitara चे बुकींग सुरू

0
1284

maruti suzuki grand vitara
बहुप्रतीक्षित मारुती सुझुकी ग्रँड विटारा कॉम्पॅक्ट एसयूव्ही अखेर भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहे. बुधवारी ही एसयूव्ही लाँच होणार आहे. इच्छुक ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून नवीन ग्रँड विटारा ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. कारचे बुकिंग सुरू झाले आहे.
नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये दोन इंजिनचे ऑप्शन मिळतील.यात पॅनोरामिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रीअर एसी व्हेंट्ससह ऑटोमॅटिक एसी, ईव्ही मोड (स्ट्राँग हायब्रीड), एचयूडी, कनेक्टेड कार टेक, रिक्लिनिंग रीअर सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील.
या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, MG Aster, Volkswagen Taigun आणि Skoda Kushak सारख्या कारसोबत होईल. नवीन विटारा कारची किंमत 9.5 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Wild life.. शिकारी खुद यहा शिकार हो गया… सिंहाला घडली अद्दल