Ather Energy ने लॉंच केली भन्नाट फिचर्सची ई स्कूटर.. पहा फर्स्ट लूक

0
677

Ather Energy ने अखेर भारतात 450X Gen3 स्कूटर लाँच केली आहे. ही 450X इलेक्ट्रीक स्कूटरचं लाँग रेंज व्हर्जन आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 146km पर्यंत प्रवास करू शकते. स्कूटरमध्ये 3.7kWh बॅटरी पॅक आणि 6kW इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, Ather 450X ला कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आले आहे. तसंच यात इको, राइड, स्पोर्ट आणि रॅप हे चार रायडिंग मोड्सही मिळतात. याशिवाय मागील बाजूस डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे. स्कूटरला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मोनो-शॉक युनिट देखील मिळते. या स्कूटरची एक्स शोरून दिल्ली किंमत 1.39 लाख रूपये असून ही डिलरशीपद्वारे किंवा ऑनलाइनही बुक करता येऊ शकते.

Jio Recharge Plan….कमी पैशात जास्त व्हॅलिडिटी…