मंत्री विखे पाटील म्हणाले…. “याची” चौकशी करावी लागेलvideo

0
1609

पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचार मुक्त शासन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील सरकारच्या काळात महसूल खात्यामध्ये काय घडलं याची चौकशी करावी लागेल, असे सांगून भविष्यात काय चांगले करता येईल यासाठी आपला प्रयत्न असल्याचे राज्याचे महसुल, पशुसंर्वधन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

स्वातंत्र दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते येथील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रत्येक वेळी आपल्याला ज्या आरोपांना सामोरे जावे लागते त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. लोकाभिमुख कारभार करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कुठे हलगर्जीपणा होणार नाही, यासंदर्भात सूचना देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.