तालुकाध्यक्षांनी ‘घड्याळ’ बांधल्यानंतर आता दस्तुरखुद्द माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

0
2008

नगर: भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष आपल्या सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले आहेत. हा विखे पाटील, कर्डिले यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता दस्तुरखुद्द माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा राहुरीसह नगर तालुक्यात रंगली आहे. कर्डिले मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी विधानपरिषदेची तयारी चालविली आहे. मात्र विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा झडत आहेत. आता त्यांच्या प्रमुख शिलेदारांनी अचानक कमळ सोडून घड्याळ बांधल्याने पुन्हा एकदा कर्डिलेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोड ठरू शकते.