सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री कर्डिले गटाचेच वर्चस्व, महाविकास आघाडीचा दारुण पराभव

0
805

नगर – नगर तालुक्यांमध्ये सध्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देवगाव सोसायटीवर मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरु ग्राम विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.
यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या ह्या शेतकऱ्यांशी निगडीत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सेवा सोसायट्या करत असतात. शेतकऱ्यांना सेवा सोसायटीमार्फत जिल्हा बँकेकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच नगर तालुक्यातील सभासदांनी सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये मतदान करून आमच्या ताब्यात दिल्या आहेत.देवगाव सेवा सोसायटी वर माजी सभापती विलास शिंदे,देव गावचे सरपंच संभाजी वामन, उपसरपंच हरिदास खळे,नगर तालुका खरेदी विक्री संघाचे चेरमन सुरेश सुंभे ,अंबादास शेळके ,पंढरीनाथ वामन,सोमनाथ वामन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली असून सर्वच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आले असल्याची माहिती यावेळी दिली.

नगर तालुक्यातील देवगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल संचालक किसन वामन, भाऊसाहेब वामन, माणिक वामन, विलास शिंदे, बाळकृष्ण वामन, भाऊसाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, मच्छिंद्र शिंदे, बाबाजी खळे, सुमन शिंदे, राहीबाई शिंदे,संभाजी वामन आदींसह सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ रामदास वामन, कुंडलिक वामन, रूपचंद वामन, काशीनाथ वामन, धोंडीभाऊ वामन, विजय वामन, सोमनाथ शिंदे, अंकुश वामन, सोमनाथ वामन, ज्ञानेश्वर ताकटे,अर्जुन काळे, रोहिदास शिंदे, अर्जुन वामन आदी उपस्थित होते.