लागवड केलेला व गळीतासाठी उपलब्ध असलेल्या ऊसाची माहिती शेतकऱ्यांनी कारखान्यांना द्यावी
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे आवाहन
अहमदनगर,दि.२५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – गळीत हंगाम २०२२-२३ साठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे लागवड केलेल्या व गळीतासाठी उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या नोंदी संबंधित कारखान्याकडे विहीत वेळेत देणे व कारखान्याने त्याची लेखी पोहोच पावती शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
भविष्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम आखणी करणे व शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेत तोड मिळणेच्या दृष्टीने ही अत्यावश्यक बाब आहे. जर ऊस नोंद व पोहोच पावती बाबत शेतक-यांची तक्रार असल्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर), दुसरा मजला, त्रिलोक चेंबर, लालटाकी रोड, अहमदनगर या कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलींद भालेराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.






