जिल्ह्यात लम्पी आजाराचा विळखा घट्ट…तीन जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू

0
951

अहमदनगर -जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. आतापर्यंत लम्पीची लागण झालेल्या जनावरांची संख्या 103 झाली असून यामुळे 86 गावांच्या परिसारातील पाच किलोमीटर भागाचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाला करावे लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राहुरी, राहाता आणि पाथर्डी तालुक्यातून प्रत्येकी एक गोवंशी जनावराचा लम्पीमुळे बळी गेला आहे.
तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशूसंवर्धन आणि पशूधन विकास अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. या समित्या लम्पी आजाराच्या संनियंत्रणाचे काम करणार असून लसीकरण सोबत बाधित भागातून जनावरांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक थांबवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या कामात दिरंगाई करून आजाराचा प्रार्दुभाव वाढवणार्‍यांवर दंडात्मक आणि अन्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येेरेकर यांनी स्वत: फिल्डवर उतरून बाधित भागात भेटी देत पशूसंवर्धन अधिकार्‍यांना सूचना दिल्या.