Amazon E Scooter… अमेझॉनवर अवघ्या 6 हजारांत ई स्कूटर उपलब्ध, घरपोच डिलिव्हरी

0
796

Amazon E Scooter अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग केली जाते.आता या ई-कॉमर्स साईटने भारतात बॅटरी बेस्ड स्कूटी म्हणजेच इलेक्ट्रिक स्कूटर विकणं सुरू केलं आहे. या साईटवरून तुम्ही महिन्याला ६,०४१ रुपये देऊन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. अमेझॉनवरून तुम्ही ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

ओकायाचे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला कुठल्याही शोरूममध्ये जाण्याची गरज नाही. या स्कूटर तुम्ही अमेझॉनवरून घरबसल्या खरेदी करू शकता. या ई-कॉमर्स साईटने दावा केला आहे की बुकिंगनंतर १५ दिवसांच्या आत स्कूटर तुमच्या घरी डिलीव्हर केली जाईल.