OnePlus
Flipkart वर The Big Billion Days Sale चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल कालपासून सुरू झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन पासून स्मार्ट टीव्ही पर्यंत अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यापैकी एक म्हणजे OnePlus Y1S स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीला ४० टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. सोबत या टीव्हीवर ९ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या टीव्हीची किंत २१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच या टीव्हीवर Axis Bank क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर १७५० रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. या टीव्हीवर No cost EMI अंतर्गत दर महिना २ हजार १६७ रुपये देवून खरेदी करू शकतात.
तुम्ही जर जुना टीव्ही देवून नवीन खरेदी करीत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत ९ हजार रुपयांपर्यंत ऑफ दिला जावू शकतो. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर ३ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे.







Yes
Comments are closed.