खासदार विखे पाटील म्हणाले….तर पुन्हा मतं मागायला येणार नाही..

0
2108

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सरकारने भाजपाचे लोकप्रतिनिधी असल्याने सूडबुद्धीने त्यांच्या कार्यकाळात विकासासाठी भरीव निधी दिला नाही. मात्र आलेले सरकार हे शेतकर्‍यांचे, सर्वसामन्यांच्या हिताचे असल्याने शेवगाव तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख रस्त्याची कामे प्राधान्याने हाती घेऊन दोन वर्षात पूर्ण करू अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नाही असा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केला.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक बन्नोमाँ दर्गा यात्रा उत्सवास खा.सुजय विखे यांनी भेट देऊन वाजत गाजत कार्यकर्त्यांसह चादर अर्पण केली. त्यानंतर देवस्थानच्यावतीने खा.सुजय विखे यांचा अध्यक्ष कुंडलिक घोरतळे यांनी सत्कार केला

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, माजी जि.प. सदस्य नितीनराव काकडे, सरपंच सुभाष पवळे, सदा गायकवाड, मयूर हुंडेकरी, महादेव घोरतळे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,

राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर भरवसा ठेवला आणि त्यांनी शिवसेनेची वाट लावली आहे. खा शरद पवार यांचे नाव न घेता खा. विखे यांनी खोचक टीका केली