Flipkart Offer
फ्लिपकार्टवर Adsun Frameless HD Ready LED Smart टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे. हा ३२ इंचचा अँड्रॉइड टीव्ही आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीची लिस्टेड किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे, मात्र टीव्हीच्या किंमतीमध्ये ७० टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे, या टीव्हीची किंमत आता ८ हजार ९९९ रुपये इतकी झाली आहे. ही एक फ्रेमलेस स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. फ्रेमलेस डिजाईनमध्ये संपूर्ण स्क्रिनचा वापर होतो.
एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरल्यास १ हजार ७५० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. तर एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर २ हजार २५० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. टीव्हीवर अॅडसनकडून ३ वर्षांची वॉरंटी देखील मिळत आहे.






