बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे.
इशान किशनने शानदार फटकेबाजी करत कारकीर्दतील पहिले द्विशतक झळकावले. सगळ्यात कमी चेंडूत द्विशतक करत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलने १३८ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते व तो १४७ चेंडूत २१५ धावा करून बाद झाला होता. मात्र इशान किशनने केवळ १२६ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आणि १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला.