1 एप्रिल पासून पॅनकार्ड होईल रद्द, आयकर विभागाचे मोठं पाऊल..

0
23

आयकर विभागाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ज्या पॅनकार्ड धारकांनी आपलं पॅन अद्याप आधारशी लिंक केलेलं नाही, त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असं सांगितलं आहे. तसेच, आयकर विभागाने ट्वीट करत सर्वांना एक इशाराही दिला आहे. जर दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या संबंधित व्यक्तीचं पॅनकार्ड निष्क्रिय केलं जाईल, असा इशारा आयकर विभागानं दिला आहे.