ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या ‘या’ वस्तूंचा वापर करु नयेत

0
794

दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंचा वापर करतो आणि या सर्व वस्तूंचा आपल्यावर शुभ-अशुभ प्रभाव पडतो.

बूट-चप्पल
ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या पायामध्ये शनिदेवाचा वास आहे आणि यामुळे चप्पल-बूट शनीशी संबंधित मानले जातात. यामुळे जर आपण इतरांचे चप्पल-बूट वापरले तर कुंडलीत शनी अशुभ होतो.

टॉवेल
काही लोक इतरांचा टॉवेलही वापरतात. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार ही सवय तुमच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते. इतरांचा टॉवेल युज केल्याने त्यांची नकारात्मकता आपल्यावर पडू शकते. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला त्वचा रोग असेल आणि तो टॉवेल आपण युज केल्यास याचेही वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

तेल
काही लोक घराबाहेर इतर ठिकाणी गेल्यानंतर केसांना लावण्यासाठी इतरांचे हेअर ऑइल वापरतात. यामुळे शनी दोष वाढतात. कारण तेल शनीशी संबंधित आहे. यामुळे इतरांचे तेल वापरू नये.

रत्न
ज्योतिषमध्ये रत्नाचे विशेष महत्त्व आहे. रत्न धारण केल्याने ग्रह दोष कमी होतात परंतु चुकीचे रत्न धारण केल्याने ग्रहांचे दोष वाढतात. यामुळे तुम्ही इतरांचे रत्न धारण केल्यास तुमच्यासाठी हे अशुभ ठरू शकते. यामुळे कधीही इतरांचे रत्न वापरू नयेत.

पेन
अनेक वेळा आपण एखाद्या कामासाठी इतरांचा पेन घेतो परंतु काम झाल्यानंतर पेन परत द्यायचे विसरून जातो. ही गोष्ट आपल्यासाठी आर्थिक अडचण आणि अपमानास कारणीभूत ठरू शकते. यामुळे चुकूनही इतरांचा पेन स्वतःकडे ठेवून घेऊ नये.

रुमाल
कोणत्याही व्यक्तीच्या रुमालाचा वापर करू नये. यामुळे त्या दोन लोकांमध्ये वाद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. यासोबतच इतरांचा रुमाल घेणाऱ्या व्यक्तीला वारंवार आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

घड्याळ
हातामध्ये घालण्यात येणारे घड्याळाची मनुष्यावर चांगल्या वाईट ऊर्जेचा प्रभाव टाकते. इतरांचे घड्याळ घातल्यास व्यक्तीला कामामध्ये अपयश आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे इतरांचे घड्याळ वापरू नये.

अंथरूण
एखाद्या व्यक्तीच्या अंथरुणावर किंवा पलंगावर झोपणे वास्तुदोष मानला जातो. असे केल्याने त्या पलंगावर झोपणाऱ्या लोकांमध्ये वाद होतात आणि इतर व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागते.

पैसा
इतरांच्या पैशांवर डोळा ठेवणे किंवा उसने घेतलेले पैसे परत न करणेसुद्धा आर्थिक अडचण आणि दुर्भाग्याचे कारण ठरते. यामुळे एखाद्याकडून उसने घेतलेले पैसे लगेच परत करावेत.

कपडे
इतरांचे कपडे मागणे किंवा परिधान करणे विविध प्रकारच्या आर्थिक अडचणींना आमंत्रण देते. इतरांचे कपडे घातल्याने दुःखाला सामोरे जावे लागते. यामुळे इतरांचे कपडे घालू नयेत.”

साभार सोशल मिडीया