संगमनेर (Sangamner news update) तालुक्यातील एका गावात जमिनीला भेगा पडल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. जमिनीला पडलेल्या भेगा वाढत चालल्यानं लोकांमध्ये भीती पसरली आहे. भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत की काय, असा प्रश्न स्थानिक गावकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कुपनलिकेचं पाणीदेखील आटलं आहे.
संगमनेर तालुक्यात बोरबन गावात हा सगळा प्रकार पाहून गावकरी भयभीत झाले आहे. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार गावातील लोकांच्या निदर्शनास आला. यानंतर गावातील लोकांनी फोन करुन या संपूर्ण प्रकाराची माहिती संरपंच आणि इतर प्रशासकीय यंत्रणा दिली. सरपंचांनी माध्यमांशी म्हटलंय, की..
सकाळी रहिवाशांनी जमिनीला पाच दे दहा फूट भेगा पडल्याचं कळवलं. त्यानंतर येऊन पाहणी केली आहे. येऊन पाहिल्यानंतर ही भेग तब्बल दोनशे ते अडीचशे फूट खोल असल्याचं निदर्शनास आलं आहे. आता याबाबत संबंधित यंत्रणाला माहिती देण्यात आली आहे.
बोरबन गावातील टेकडवाडी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. पठार भागात आणि परिसरात याआधी भूकंपाचे सौप्य धक्के जाणवले होते. त्यानंतर आता जमिनीला भेगा पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर बोरबन गावातील नागरीक घाबरले आहेत.