कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. ‘कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,’ असे ते म्हणाले.
राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले – ‘सर्वप्रथम मी कर्नाटकच्या जनतेला, तथा या निवडणुकीत अपार कष्ट उपसणाऱ्या तेथील कार्यकर्त्यांना व नेत्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे धनदांडग्या भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीबांची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. यापुढे हेच संपूर्ण देशात घडेल. काँग्रेस या निवडणुकीत गरीबांच्या बाजूने उभी होती. हा सर्वांचा विजय आहे. हा कर्नाटकच्या विजयाचा विजय आहे. मतदारांचे मनस्वी आभार.’






