AAP….नेवासा तालुक्यात आम आदमी पार्टी एक समर्थ पर्याय म्हणून उभी राहील असा ठाम विश्वास आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य राजेंद्र आघाव यांनी व्यक्त केला आहे.
नेवासा येथील प्रतिथयश वकील सादिक शिलेदार यांनी पत्रकार प्रवीण तिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळवे आदींसह नुकताच राजेंद्र आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी मुंबईत या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.
यावेळी शिंदे यांनी आम आदमी पक्षाच्या गेल्या सात वर्षांतील राजकीय वाटचालीचे विश्लेषण करून पंजाब विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातूनही पक्षात इनकमिंग वाढल्याकडे लक्ष वेधले. 2024 मध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रात दमदारपणे उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून नगर जिल्ह्यात विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.






