मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि नवरदेव सॉफ्ट ड्रिंकची एक छोटी बाटली उघडतो आणि त्यातून एक चुस्की घेतो. परंतु काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. नवरदेवाचे मित्र त्याला कोल्ड्रिंकची बॉटल देतात. मात्र ते पिल्यावर नवरदेव खूप विचित्र रिअॅक्शन देतो. त्याला समजतं की त्याच्या मित्रांनी कोल्डिंगमध्ये काहीतरी मिसळून दिलं आहे. ते पिताना तो नवरीकडे पाहतो आणि नवरीलाही त्याच्या रिअॅक्शन वरुन ती कोल्ड्रिंक नसल्याचं समजतं.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल लग्नात नवरदेवाला मित्रांनी गुपचूप पाजली दारु, नवरीला कळताच झालं…Video






