ये दोस्ती हम नहीं तोडेंगे!सायकल तुटेल पण मैत्री नाही, चिमुकल्यांनी केला भन्नाट जुगाड व्हिडिओ

0
54

सर्वांचे मन जिंकणाऱ्या व्हिडिओ पाहून तुमच्या लहानपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आपल्या भन्नाट शैलीने सायकल चालविताना दिसत आहे जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या चिमुकल्यांकडे एक छोटी सायकल आहे पण त्या सायकलला एकच सीट आहे. त्यामुळे सायकल चालविताना एकावेळी एकच जण सीटवर बसू शकतो. पण या दोन मुलांनी या समस्येवर अतरंगी जुगाड शोधला आहे आणि एकच सायकल दोघांनी चालवली आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? हीच तर या व्हिडिओची विशेषता आहे. सायकलच्या एका पँडलवर एक जण आणि दुसऱ्या पँडलवर दुसरा असे उभे राहून या दोघांनी ही सायकल चालवली आहे. त्यांनी सायकल चालविण्याची नवीन पद्धतच जणू शोधली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल आणि तुमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून झालं.