बुऱ्हाणगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाईप नगर सोलापूर रोड चे काम सुरू असल्याने कायमच तुटत आहेत, त्यामुळे वाकोडी,दरेवाडी,वाळुंज,शिराढोन,पारगाव, दहेगाव, साकत,वाटेफळ, रुई छत्तीसी ह्या गावांना जवळपास महिनाभरा पासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही नुकतेच पारगाव फाट्यावर लोकांनी जिल्हा परिषद, व लोकप्रतिनिधी यांचेवर नाराजी व्यक्त केली होती त्याची दखल घेऊन संदेश कार्ले यांनी आपल्या सहकारी यांच्यासह आज सोलापूर रोड चे काम बंद ठेवण्यास सांगितले प्रथम नियमाप्रमाणे पिण्याच्या पाईप लाईनचे स्थलांतरण करणे मगच रस्त्याचे काम करा असा आग्रह धरला ऐकून 19 किमी नवीन स्थलांतरित पाईप लाईन केल्याशिवाय रोडचे कामच करायचे नाही अशी भूमिका घेतली दुपारच्या 1 वाजता भर उन्हात सर्व कार्यकर्ते व कंपनीचे अधिकारी यांच्यात अशी खडाजंगी सुरू होती व पाईप दुरुस्त करण्याचे कामही लगेच सुरु होते शेवटी जर रस्त्याचे काम करताना जर मशिनरी आढळली तर त्यास मारहाण होणार असा दम दिल्यावर कंपनीच्या अधिकारी यांनी वरिष्ठांना फोन करून नगर तलुक्याच्या हद्दीतील खोदाईचे काम बंद ठेवण्याचे सांगितले व तसे लिखित स्वरूपात दिले जेणे करून पाईपलाईन फुटणार नाही व लोकांना पाणी पुरवठा सुरळीत होईल.
यावेळी संदेश कार्ले यांनी सांगितले की सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने लोकांना तक्रार कुणाकडे करायची, लोकांच्या अडचणी कुणी सोडवायच्या प्रशासक फक्त कामे वशिल्या वाल्यांचे मंजूर करतात त्यांना लोकांचे काही घेणे देणे नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे लोकांचा सरकार वरही मोठ्या प्रमाणात नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कालेॅ, दत्तात्रय खांदवे, अमोल उद्धव तोडमल, सरपंच अमोल संपतराव तोडमल, ज्ञानेश्वर कोरडे, भाऊ बेरड,ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी GHV कंपनीचे संपर्क अधिकारी अमोल बोबडे, दत्ता वाघ, उपसरपंच महेश म्हस्के
Home नगर जिल्हा बुऱ्हाणगर प्रादेशिक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन पून्हा फुटली, संदेश कार्ले आक्रमक….व्हिडिओ