लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वधू-वरांचे किस्से तर कधी लग्नातील डान्स व्हिडीओ चर्चेत असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
या व्हिडीओत नवरदेव नवरीसोबत नाही तर नवरीच्या आईसोबत म्हणजेच सासूसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका स्टेजवर नवरदेव डान्स करत आहे आणि नवरीसुद्धा नवरदेवासोबत डान्स करताना दिसत आहे. इतक्यात अचानक स्टेजवर नवरीची आई येते आणि त्यांच्यासोबत डान्स करायला सुरुवात करते.
व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसते की नवरदेव सासूसोबत बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. सासू-जावयाची ही डान्स जोडी नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. सासूबाईने चेहऱ्यावर ‘घुंघट’ घेतला आहे त्यामुळे सासूबाईचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाही.