पान मसाला जाहिरात केली म्हणून गावस्कर, सेहवागवर टीका, चाहत्यांनी व्हिडिओ पोस्ट करीत गंभीरला दाखवला आरसा…

0
22

गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी पान मसालाची जाहिरात केल्याबद्दल सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांना चांगलेच झापले होते. पण आता क्रिकेट चाहत्यांनी गंभीरला चांगलाच आरसा दाखवला आहे. चाहत्यांनी आता गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

गंभीरचा आता एक जुना व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग हे तर पान मसाल्याची जाहिरात करत होते. पण त्यापूर्वी गंभीरने एका मद्याच्या ब्रँडची जाहिरात केल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पान मसाला पेक्षा मद्य चांगले आहे का… असा प्रश्न आता चाहत्यांनी थेट गंभीरला विचारला आहे. कारण जेव्हा गंभीरने सुनील गावस्कर आणि गौतम गंभीर यांच्यावर टीका केली होती तेव्हा तो आपण नेमकं यापूर्वी काय केलं आहे, ते विसरला होता. त्यामुळे आता तो चांगलाच ट्रोल झाला आहे.